व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच हे पैसे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे आणि त्यासाठीच आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्थेची मुदत ठेव योजना आहे आपल्या सेवेत; ज्यात रक्कम सुरक्षित राहते व आकर्षक व्याजही मिळते. आपली बचत नाहक खर्च होऊ नये यासाठी बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आमच्या मुदत ठेव योजनांचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
Tenure | Int Rate | Senior Citizen Rate |
---|---|---|
3 Months | 7% | |
6 Months | 7% | |
9 Months | 7.5% | |
12 Months | 9% | 9.25% |
13 Months & above | 9% | 9.25% |
आज लावलेले झाड भविष्यात फळांसह सावलीही देते. पण त्या भविष्यातील आरामदायी जीवनासाठीचे बीज आजच पेरायला हवे, जेणेकरून वृद्धापकाळात निश्चिंत जीवनाचा आनंद घेता येईल आणि यासाठीच आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्थेची ठेव योजना सर्वोत्तम ठरते.
एका ठराविक वयानंतर आपली सर्व कामं, जबाबदाऱ्या आणि धकाधकीच्या जीवनाला बाजूला सारून समाधानाने जगण्याची वेळ येते. या समाधानी जीवनात आर्थिक अडचणींमुळे व्यत्यय येऊ नये यासाठी आताच तरतूद करा, आमच्या मासिक ठेव योजनेमध्ये रु. 1 लाखाच्या गुंतवणुकीवर प्रतिमहा आकर्षक व्याजदरासह परतावा मिळवा, जेष्ठ नागरिकांसाठी 0.3% अधिक व्याजदराचा फायदा. निवृत्तीनंतर आनंद द्या समाधानी जीवनाचा, मासिक ठेव योजनेच्या अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
Investment Amount | Interest Rate | Senior Citizen Rate |
---|---|---|
₹1,00,000 | Attractive Monthly Rate | +0.3% |
मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी! आज तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहात, त्यालाच जोड द्या आकर्षक व्याजदराची. आपल्या सेविंग्स आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्थेत दाम दुप्पट योजनेत गुंतवा. जेणेकरून, ठराविक काळानंतर तुमची रक्कम होईल दुप्पट आणि तुमचं हवं ते स्वप्न पूर्ण होईल अपेक्षेपेक्षा लवकर!
आमच्या दाम दुप्पट योजनेंतर्गत १०२ महिन्यात तुम्ही गुंतवलेली रक्कम दुप्पट होऊन मिळते. उदा. तुम्ही रु. १ लाख गुंतवले तर ९६ महिन्यानंतर तुम्हाला रु. २ लाख मिळतात. मग आजच निर्णय घ्या, आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पहिलं पाऊल उचला.
गुंतवणूक रक्कम | कालावधी | परतावा |
---|---|---|
₹1,00,000 | १०२ महिने | ₹2,00,000 |
₹2,00,000 | १०२ महिने | ₹4,00,000 |
₹5,00,000 | १०२ महिने | ₹10,00,000 |
दाम दुप्पट योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्था मर्या सरवडे शाखेशी संपर्क साधा.
आजच्या छोट्याश्या गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. म्हणूनच स्वतःला छोट्या छोट्या बचतीची सवय लावायला हवी. याच विचारातून आम्ही एक तरतूद केली आहे.
रोजंदारीवर काम करणारे कामगार, लहानसहान व्यापारी आणि शेतकऱ्यांना बचतीची सवय लागावी तसेच त्यांच्या लग्न, घर खरेदी, वाहन खरेदी अशा मोठ्या भांडवली गरजा वेळीच भागवण्यासाठी मोठी रक्कम साठवली जावी म्हणून आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्थेने पिग्मी अर्थात दैनंदिन ठेव योजना सुरू केली. या योजनेत रोजच्यारोज अगदी कमीत कमी रक्कम गुंतवून उद्या एकत्रितपणे एका मोठ्या रकमेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
गुंतवणूक रक्कम (दैनिक) | एकत्रित रक्कम (अंदाजे) | कालावधी |
---|---|---|
₹10 | ₹3,000 | 300 दिवस |
₹20 | ₹6,000 | 300 दिवस |
₹50 | ₹15,000 | 300 दिवस |
₹100 | ₹30,000 | 300 दिवस |
आमच्या पिग्मी योजना अंतर्गत, तुम्ही कमी गुंतवणुकीतून मोठी बचत साधू शकता. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्थेशी संपर्क साधा.
**ठेव योजना अर्ज प्रक्रियेची माहिती:**
1. अर्ज प्रक्रिया: ठेव योजनेसाठी अर्ज करण्यासाठी संस्थेकडे फॉर्म भरावा लागतो. या फॉर्ममध्ये अर्जदाराची माहिती, ठेवीची रक्कम आणि कालावधी नोंदवावी लागते.