महाराष्ट्र हा सहकारी चळवळीत देश पातळीवर स्वतंत्रपूर्व काळापासून अग्रेसर आहे.सद्यस्थितीत या सहकारी संस्थांचा झालेली वाढ गुनात्मक व संख्यात्मक अशी दोन्ही पातळीवर दिसून येते. मा.श्री.नामदेवराव रेपे यांना लाभलेल्या सहकार वारश्यातून,त्यांच्या सामाजिक विचारातून त्यांनी आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्था सरवडे या संस्थेची स्थापना करणेचा निर्णय घेतला त्या प्रमाने दि.२४ मार्च २०२४ रोजी सरवडे येथे पतसंस्थेची स्थापना झाली.या संस्थेने व्यापक समाजहित हा उद्देश समोर ठेवून त्यासाठी लागणारी सृजनात्मक व सकारात्मक पावले संस्थेच्या प्रत्येक सदस्याने उचलल्या मुळे आज रोजी संस्था यशाचे शिखर गाठत आहे.
सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करून त्यांना स्थिर आणि दीर्घकालीन वित्तीय सुरक्षितता प्रदान करणे. सहकारी तत्त्वांवर आधारित, पारदर्शक आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा देणे. लहान गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन प्रत्येक सदस्याला भविष्याची आर्थिक सुरक्षा मिळवून देणे.
बचत योजना:
आमच्या सुरक्षित आणि आकर्षक व्याजदरासह बचत खाते योजना सदस्यांना नियमित बचत करण्याची संधी देते. संस्थेच्या बचत योजनेत सहभागी होऊन तुम्ही लहान रकमेतून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू शकता.
कर्ज योजना:
व्यक्तिगत कर्ज: वैयक्तिक गरजांसाठी त्वरित आणि सोयीस्कर कर्ज सुविधा.
गृह कर्ज: घर खरेदी, बांधकाम किंवा नूतनीकरणासाठी विशेष गृह कर्ज योजना.
व्यापार कर्ज: छोट्या व्यवसायिकांना आणि उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी वित्तीय मदत.
वाहन कर्ज: नवे किंवा वापरलेले वाहन खरेदी करण्यासाठी अनुकूल दरासह कर्ज योजना.
फिक्स्ड डिपॉझिट (मुदत ठेवी):
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय. उच्च व्याजदरासह मुदतीच्या ठेवी सदस्यांना स्थिर परतावा देतात.
आवर्ती ठेवी (Recurring Deposit):
दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करून मोठा परतावा मिळवण्याची योजना. लहान रकमेतून मोठी बचत करण्यासाठी उत्तम पर्याय.
शिक्षण कर्ज:
उच्च शिक्षणासाठी आवश्यक वित्तीय सहाय्य देण्यासाठी आम्ही विशेष कर्ज योजना देतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना गती मिळते.
मोबाईल बँकिंग
ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व रोकड विरहित (कॅशलेस) व्हावे यासाठी आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्था मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे.
याद्वारे ग्राहक त्याच्या मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे करू शकतो. हे मोबाईल अँप वापरण्याकरता अत्यंत
सोपे आहे तसेच कुठल्याही अडचणीकरता संस्थेच्या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधून ग्राहकांना बोलता येते.
इंटरनेट बँकिंग
आजकाल कोणालाही इंटरनेट शिवाय एक दिवस काढणे अवघड आहे, इंटरनेट मनोरंजनाबरोबर त्याच्या दैनंदिन कामातही महत्वाचा घटक आहे.
आमचे अनेक ग्राहक नोकरदार आहेत व त्यांना छोट्या-मोठ्या कामाकरिता संस्थेत येणे शक्य होत नाही,
त्यांच्या करता आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्थेची इंटरनेट बँकिंग सुविधा महत्वाची ठरते.
या द्वारे ग्राहक सर्व प्रकारची कामे घर अथवा ऑफिस मधून त्याच्या वेळेनुसार सहजपणे करू शकतो.
व्यवसायाला द्या नवी गती! क्यू.आर. कोड
व्यावसायिक, छोटे व्यावसायिक किंवा किराणा दुकानदार या सर्वांना रोखीचे व्यवहार करताना विविध अडचणींना सामोर जावं लागत. कधी सुट्टे पैसे नाहीत म्हणून उभा राहणारा प्रश्न किंवा रोखीचे पैसे बाळगण्याची चिंता असते. या सर्वावर आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्था घेऊन आले आहे आधुनिक मार्ग.
आपल्या व्यवसायाला गती देताना डिजिटल बँकिंगची साथ देण बदलत्या काळाची गरज बनली आहे. UPI QR CODE द्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारताना 5 लाखापर्यंत व्यवसायिक कर्ज आदिशक्ती रेणुका भक्त सहकारी पतसंस्थे कडून आपल्याला दिले जाणार आहे. तरी आमच्या या योजनेमध्ये भागीदार व्हा आणि आपल्या व्यवसायाला गती द्या.
1.पारदर्शकता आणि विश्वासार्हता:आमच्या संस्थेचे प्रत्येक व्यवहार पारदर्शक आणि ग्राहकांच्या हिताचे असतात.
2.आधुनिक तंत्रज्ञान: डिजिटल सेवांचा वापर करून आम्ही तुमचे व्यवहार सुलभ आणि सुरक्षित बनवतो.
3.विशेष सल्ला: प्रत्येक सदस्याला वैयक्तिक वित्तीय सल्ला आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देतो.
4.सुलभ प्रक्रिया: कर्ज मंजुरीसाठी त्वरित आणि सोयीस्कर प्रक्रिया.
श्री.आदीशक्ती रेणुका भक्त सहकारी पत संस्था आपल्या सदस्यांच्या विश्वासावर उभी राहिली आहे. आम्ही प्रत्येक ग्राहकाच्या आर्थिक प्रगतीसाठी नेहमीच वचनबद्ध आहोत. संस्थेने आपल्या विश्वासार्ह सेवांमुळे समाजात एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे, जिथे प्रत्येक सदस्याला कुटुंबासारखा मान दिला जातो.